Heartfulnesss Logo
  • आमच्या बद्दल
    • आम्ही कोण आहोत
    • आमच्या सोबत जुडा
  • सविस्तर पहा
    • वैयक्तिक सराव
    • वैयक्तिक प्रशिक्षक
    • गट सत्रे
    • हार्टफुलनेस उपक्रम
  • अंतर्दृष्टी
    • हार्टफुलनेस रिसर्च
    • हार्टफुलनेस मासिक
    • भंडारा संदेश
  • कार्यक्रम
  • देणगी
मागे

लालाजी महाराज

1873 – 1931

lalaji-master

फतेहगढचे श्री. राम चंद्र, ज्यांना प्रेमाने लालाजी म्हणून ओळखले जाते, ते हार्टफुलनेस परंपरेतील पहिले गुरू होते. त्यांनी यौगिक प्राणाहुतीच्या प्राचीन कलेचे पुनरुज्जीवन केले जेणेकरुन स्वत:च्या उत्क्रांतीबद्दल प्रामाणिक रस असलेल्या सर्व साधकांना चेतनेचा सर्वोच्च विस्तार अनुभवता येई.
कौटुंबिक जीवन हे आत्म-विकासासाठी अत्यंत अनुकूल आहे असा लालाजींचा ठाम विश्वास होता. किंबहुना, त्यांना प्रेरणा देण्याचे आणि सत्याच्या मार्गावर जागृत ठेवण्याचे श्रेय त्यांनी आपल्या पत्नीला दिले.
स्वभावत: लालाजी नेहमी शांत होते, पण इतरांच्या दुःखाने आणि सुखाने ते सहज हळवे व्हायचे. ते क्वचितच रागवायचे. अतिरीक्त वक्तव्य न करता, आपले विचार व्यक्त करणारी आणि श्रोत्यांची मने जिंकणारी भाषा वापरण्यात ते वाकबगार होते. त्यांचे व्यक्तिमत्व, राहणीमान आणि सामान्य वागणूक यामुळे लालाजींनी सर्वांचा स्नेह आणि आदर मिळवला.
पापणी लवण्याच्या आतच लालाजी व्यक्तींमध्ये आध्यात्मिक जागृती आणू शकत होते, परंतु कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन त्यांना आवडायचे नाही. हृदयातील विविध गुंतागुंत दूर करण्यासाठी, त्यांनी आपल्या अनुयायांना त्यांच्या शत्रूंना मित्र बनवण्यास सांगितले. त्यांनी आत्मसाक्षात्कारासाठी नैतिकता आवश्यक असल्याचे आणि प्रेम ही सर्वात मोठी प्रथा असल्याचे मानले. त्यांनी शिकवले की दुःख हे दैवी आशीर्वाद आहेत ज्यामध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत.
त्यांच्या कार्यालयात नसले की लालाजी साधकांना प्रशिक्षण देत असत आणि पहाटे दोन वाजेपर्यंत त्यांना प्राणाहुती देत असत. 1929 मध्ये निवृत्तीनंतर, त्यांनी आपला समस्त वेळ अध्यात्मिक कार्यासाठी दिले, आणि दररोज दोन ते तीन तास पुस्तके, लेख आणि पत्रे हे लिहिण्यासाठी मजकूर सांगण्यात घालवत असत. ते उर्दू, पर्शियन आणि अरबी भाषेचे उत्तम अभ्यासक होते आणि त्यांना हिंदी आणि संस्कृतचे उत्कृष्ट ज्ञान होते.
लालाजी साधेसरळ आणि धार्मिक जीवन जगले. त्यांचे नाव सर्वदूर पसरले आणि बरेच लोक समाधान आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे आले. आध्यात्मिक प्रगतीचा आशीर्वाद दिल्याशिवाय त्यांनी कधीही कोणाला माघारी जाऊ दिले नाही. त्यांना स्वतःला मधुर आवाजाची देण होती आणि त्यांच्या गाण्यांमधे श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करण्याची ताकद होती. या महान मार्गदर्शकाच्या कार्यामुळेच आज, अध्यात्माची आवड असलेल्या सर्व साधकांना हार्टफुलनेस एक सोपी आणि प्रभावी साधना देऊ शकली आहे.
प्राणाहुतीची कला लालाजींकडून शहाजहानपूरच्या श्री. राम चंद्र (ज्यांना बाबूजी म्हणून ओळखले जाते) यांच्यापर्यंत पोहोचली, आणि ते हार्टफुलनेस परंपरेतील दुसरे मार्गदर्शक बनले.

मागील
पुढे
HeartfulnessLogo_Wht_Pwd
play.png
app.png

सोशल मीडिया

  • लिंक्डइन लिंक्डइन
  •  फेसबुक फेसबुक
  • ट्विटर ट्विटर
  • इंस्टाग्राम इंस्टाग्राम
  • व्हॉट्सअॅप व्हॉट्सअॅप

उपयुक्त दुवे

  • दाजी
  • कान्हा
  • प्रशिक्षक
  • दैनिक विचार
  • देणगी

अंतर्दृष्टी

  • हार्टफुलनेस रिसर्च
  • हार्टफुलनेस मासिक

© 2026 हार्टफुलनेस - सर्व हक्क राखीव

अटीगोपनीयता