हार्टफुलनेस भावनांशी निगडित आहे. आपले संपूर्ण जीवन भावना आणि प्रेरणांनी चालते, आणि ती हृदयाची भूमिका असते. जेव्हा आपण हृदयाचे ऐकण्यात यशस्वी होतो आणि आतून येणारी प्रेरणा पकडू शकतो, तेव्हा आपण आपल्या जीवनावर प्रभुत्व मिळवण्यास शिकतो. हृदयाचा मनाबरोबर जुळवून घेण्याचा हा संपूर्ण प्रयास हा हृदयावरील ध्यानाद्वारे होतो, आणि म्हणूनच त्याला हार्टफुलनेस मेडिटेशन म्हणतात.
हार्टफुलनेस ही 100 वर्ष जुनी परंपरा आहे जी, वैज्ञानिक तपास आणि कालपरत्वे चिंतनशील पद्धती एकत्रित करत काळाबरोबर विकसित होतच आहे. आंतरिक अनुभव, सत्यता, करुणा आणि जागरूकता यांचे सखोल स्तर जागृत करणाऱ्या प्राणाहुतीच्या सूक्ष्म उर्जेचा अनुभव घेण्यास प्रमाणित प्रशिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतात. हार्टफुलनेस चे सराव तुमची जागरूकता वाढवतात आणि कल्याण, समाधान, शांतता, करुणा, धैर्य आणि स्पष्टता विकसित करतात. या जागृत क्षमतेसह, आपण एकत्रितपणे आदर, शांतता आणि एकतेवर आधारित जग निर्माण करू शकतो.
उगम
1800 च्या उत्तरार्धात भारताच्या उत्तरेकडील गंगा नदीवरील फतेहगढ नावाच्या एका छोट्याशा गावात हार्टफुलनेसचा उदय झाला. ही साधना, एक परिवर्तनशील योग तंत्राची प्राचीन कला प्राणाहुती वर आधारित आहे, आणि ज्या राम चंद्रांना त्यांचे मित्र लालाजी म्हणून ओळखायचे, त्यांनी ही पुन्हा शोधून काढली. ते लहान असतानाच त्यांनी प्राणाहुतीचा पुन: शोध लावला आणि लहानपणापासूनच त्यांनी, जिचा सार्वत्रिकपणे वापर केला जाऊ शकतो अशा स्वत:च्या भल्यासाठी असणार्या एका सोप्या आणि प्रभावी पद्धतीची गरज ओळखली होती.
लालाजींनी भूतकाळातील महान परंपरांमधून सर्व अनावश्यक विधी आणि सांस्कृतिक समजुती काढून टाकून सार्वत्रिक प्रणालीमध्ये बसणार्या व आधुनिक जीवनपद्धतीच्या गरजा भागवू शकेल असा आवश्यक ध्यान पद्धतींचा संच तयार केला. त्यांनी आपल्या हयातीत अनेक अनुयायांना प्रशिक्षित केले, आणि त्यापैकी शाहजहानपूरचे राम चंद्र एक होते, ज्यांना अनेक जण बाबूजी म्हणून ओळखायचे. 1945 मध्ये, प्रशिक्षणाच्या आणि वाढत्या अनुयायांना प्राणाहुती देण्याच्या कामासाठी, बाबूजी हे लालाजींचे उत्तराधिकारी बनले, आणि त्यांच्या कार्यामुळे हार्टफुलनेस पद्धतींमध्ये आणखी सुधारणा आणि उत्क्रांती झाली.
जुलै 1945 मध्ये, बाबूजींनी भारतातील पहिली हार्टफुलनेस संस्था स्थापन केली - जगभरातील लोकांच्या कल्याणासाठी ना-नफा संस्था. बाबूजींनी नंतर विस्तृत(व्यापक प्रमाणावर) प्रवास सुरू केला, प्रथम भारतात आणि नंतर, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातील लोकांना या प्रणालीची ओळख करून दिली. त्यांच्या या प्रवासात पार्थसारथी राजगोपालाचारी, ज्यांना चारीजी म्हणून ओळखले जाते त्यांनी साथ दिली आणि 1983 मध्ये ते बाबूजींचे उत्तराधिकारी बनले. चारीजींच्या वारंवार परदेश दौऱ्यांमुळे जगभरात हार्टफुलनेस चळवळीचा लक्षणीय विस्तार झाला आणि त्यांनी शाळा, शिष्यवृत्ती कार्यक्रम, संशोधन सुविधा याकरता कार्यक्रम विकसित केले तसेच मोफत आरोग्य सेवा दवाखाने, आणि संयुक्त राष्ट्रांच्या सार्वजनिक माहिती विभाग (UN DPI) बरोबर सहकार्य स्थापन केले. दाजी म्हणून ओळखले जाणारे कमलेश पटेल डिसेंबर 2014 मध्ये चारीजींचे उत्तराधिकारी बनले. दाजीने 1976 मध्ये हार्टफुलनेस सुरू केले आणि त्यानंतर हार्टफुलनेसचे
मार्गदर्शक होण्यापूर्वी संस्थेमधे भारत, अमेरिका, ओशनिया आणि अफ्रिका या विभागांमधील कार्यासंबंधी अनेक जबाबदार भूमिका पार पाडल्या. दाजी विवाहित असून त्यांना दोन मुले आणि चार नातवंडे आहेत. तीस वर्षे, ते न्यू यॉर्क शहरात एक व्यावसायिक होते, त्यांनी औषधविक्रीची एक साखळी विकसित केली जी आता त्यांचे पुत्र आणि इतर लोकं सांभाळत आहेत. ते एक निपुण वक्ते आहेत आणि प्रबुद्ध चेतनेचा शोध घेणाऱ्या सर्वांसाठी एक आदर्श आहेत. त्यांनी विस्तृत प्रमाणावर प्रवास केला आहे आणि सर्व स्तरातील लोकांबरोबर मिळून-मिसळून आहेतच पण तरुण पिढीवर त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आता जगभरात लाखो हार्टफुलनेस साधक आहेत.
1957 मधे, जेव्हा बाबूजींनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस डॅग हॅमरस्कॉल्ड यांच्याशी प्रथम संपर्क साधून जगातील सर्व लोकांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही साधना प्रस्तूत केली तेव्हा पासून हार्टफुलनेस चळवळ शांतता निर्माण करण्यासाठी सक्रिय आहे. 2005 पासून, हार्टफुलनेसने 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र्संघावरोबर (UN) भागीदारी केली आहे, ज्यामुळे जगभरातील त्यांच्या सर्व केंद्रांमधील स्थानिक समुदायांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. आज, जगातील सर्व प्रदेशांमध्ये हार्टफुलनेस संवाद कार्यक्रम आयोजले जातात, जे लोकांना संघर्ष मिटवण्याचा आणि सामंजस्य आणण्याचा मार्ग दर्शवतात.
हार्टफुलनेसचे मूळ योगामध्ये असल्यामुळे, आम्ही 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रचार देखील करत आहोत, आणि एक विनामूल्य ऑनलाइन सहयोगी मंच तयार केला आहे जिथे अनेक प्रणालींमधील योग तज्ञ लोकांना विनामूल्य कार्यक्रम प्रस्तुत करण्यासाठी एकत्र येतात.
लाखो लोक आपल्यावर विश्वास ठेवतात तुम्ही कशाची वाट पाहत आहात?