(1956 – आत्तापर्यंत)
प्राचीन परंपरेतील कमलेश. डी. पटेल यांना अनेकजण दाजी या नावाने ओळखतात. हार्टफुलनेस ध्यानाविषयीच्या त्यांच्या शिकवणी या त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आलेल्या आहेत, ज्यामध्ये चौकस विचार करण्याची प्रवृत्ती आणि जगातील महान आध्यात्मिक परंपरांचा व वैज्ञानिक प्रगतींविषयीचा आदर दिसून येतो.
1956 साली गुजरातमध्ये जन्म झालेल्या दाजींनी ध्यान आणि अध्यात्मात खूप लवकर रस दाखवला. फार्मासिस्ट होण्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी हार्टफुलनेस ध्यान सुरू केले. लवकरच, ते त्यांचे पहिले गुरू बाबूजी यांना भेटले, जे हार्टफुलनेसचे दुसरे मार्गदर्शक आहेत. अहमदाबादमधील एल.एम. कॉलेज ऑफ फार्मसीमधून ऑनर्ससह पदवी प्राप्त केल्यानंतर दाजी लग्न करून न्यूयॉर्क शहरात वास्तव्यास गेले. तेथे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या दोन मुलांचे संगोपन केले व त्यांनी हळूहळू एक यशस्वी औषधविक्रीचा व्यवसाय उभारला. त्याच वेळी, बाबूजींचे उत्तराधिकारी चारीजी यांचे एकनिष्ठ शिष्य म्हणून दाजींनी ध्यानाविषयी असलेल्या प्रेमाचा पाठपुरावा सुरूच ठेवला. गेल्या काही वर्षांमध्ये, दाजींनी हार्टफुलनेस चळवळीत, संघटनात्मकरित्या आणि त्याचा संदेश जगभर पसरवण्यात आणि ती पद्धत शिकवण्यात, अतिशय सक्रिय भूमिका बजावली. 2011 मध्ये, चारीजींनी त्यांचा आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून दाजींना निवडले.
हार्टफुलनेस चळवळीचा नेता म्हणून, दाजी आता आधुनिक काळातील गुरूची अनेक कर्तव्ये पार पाडतात, विस्तृत प्रमाणात प्रवास करतात आणि सर्व ठिकाणाच्या साधकांना पाठिंबा देतात. आजच्या तरुणांना व्यावहारिक स्वयं-व्यवस्थापन साधने आणि सार्वभौमिक मूल्यांसह पोषण देण्यावर दाजींचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, 2,500 हून अधिक शाळा, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक आता मूल्याधारित स्वयं-विकास कार्यक्रमांच्या सूचीचा लाभ घेत आहेत.
अध्यात्माचा स्वघोषित विद्यार्थी म्हणून, दाजी आपला बराचसा वेळ आणि शक्ती अध्यात्म आणि चेतनेच्या क्षेत्रातील वैयक्तिक संशोधनासाठी घालवतात आणि नियमितपणे त्यांचे निष्कर्ष सार्वजनिक भाषणातील कार्यक्रमात, त्यांच्या संकेतस्थळावर आणि सामाजिक माध्यमांच्या स्थळांवर आणि प्रसारण माध्यमाद्वारे, छापील आणि डिजिटल माध्यमांवर प्रसारित होतात. दाजींचे लेख हफिंग्टन पोस्ट, शिकागो ट्रिब्यून, टाइम्स ऑफ इंडिया आणि बिझनेस स्टँडर्डसह विविध आघाडीच्या प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांची लोकप्रिय रेडिओ सिटी स्वरण मालिका, दिल की आवाज, बारा भागांमध्ये झाली.
दाजी प्राचीन परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक आकलन यात सेतू सांधून घेण्याचे समर्थन करतात आणि ध्यान आणि यौगिक प्राणाहुतीच्या शारीरिक आणि अनुवांशिक प्रभावांवर संशोधन करण्यासाठी शंभर शास्त्रज्ञांचा एक चमू तयार केला आहे. अध्यात्माकडे वैज्ञानिक कार्यप्रणालीतून बघण्यावर त्यांचा विश्वास आहे – त्यांच्या स्वत:च्या अनुभवातून आणि या क्षेत्रातील प्रभुत्वामुळे आलेला एक व्यावहारिक दृष्टीकोन. जसे ते नेहमी म्हणतात, "तुम्ही प्रयोगकर्ते आहात, प्रयोग आहात आणि त्याचा परिणाम देखील आहात."
हार्टफुलनेस ध्यानपद्धती जगभरातील प्रत्येक घरात उपलब्ध व्हावी ही दाजींची इच्छा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, हार्टफुलनेस संस्था 130 देशांमधील हजारो हार्टस्पॉट्स आणि रिट्रीट केंद्रांवर विनामूल्य ध्यान प्रशिक्षण देतात आणि हार्टफुलनेस प्रशिक्षक जगभरात वैयक्तिक आणि सामूहिक ध्यान करण्यासाठी किंवा दूरस्थपणे आयफोन आणि ॲड्रॉइड उपकरणांवर हार्टफुलनेस ॲपद्वारे उपलब्ध असतात.
दाजींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
http://www.daaji.org/