Heartfulnesss Logo
  • आमच्या बद्दल
    • आम्ही कोण आहोत
    • आमच्या सोबत जुडा
  • सविस्तर पहा
    • वैयक्तिक सराव
    • वैयक्तिक प्रशिक्षक
    • गट सत्रे
    • हार्टफुलनेस उपक्रम
  • अंतर्दृष्टी
    • हार्टफुलनेस रिसर्च
    • हार्टफुलनेस मासिक
    • भंडारा संदेश
  • कार्यक्रम
  • देणगी
मागे

चारीजी महाराज

1927 – 2014

chariji-master

चारीजी म्हणूनही ओळखले जाणार्‍या श्री. पार्थसारथी राजगोपालाचारी यांचा जन्म दक्षिण भारतातील चेन्नई जवळील वायलूर येथे झाला.
वयाच्या अठराव्या वर्षी भगवद्गीतेवरील व्याख्यान ऐकल्यावर चारीजींच्या आध्यात्मिक आकांक्षा जागृत झाल्या परंतु त्यांनी त्यांचा अभ्यास सुरूच ठेवला आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली. त्यांची पहिली नोकरी रसायन तंत्रज्ञानामधे होती. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे युगोस्लाव्हियामध्ये प्लास्टिक उत्पादन तंत्राचा अभ्यास केला.
त्यांनी 1955 मध्ये लग्न केले आणि त्याच वर्षी टी.टी. कृष्णमाचारी उद्योग समुहात सामील झाले आणि लवकरच त्या समूहातील एका कंपनीच्या कार्यकारी संचालक पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारतात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर प्रवास आवश्यक असल्यामुळे जागतिक प्रवासाचा एक नमुना त्यांनी प्रस्थापित केला जो आयुष्यभर एक व्यावसायिक म्हणून आणि नंतर हार्टफुलनेसचे मार्गदर्शक म्हणून, अशा दोन्ही भूमिकेत सुरू ठेवला.
1964 मध्ये चारीजींची हार्टफुलनेस साधनेशी ओळख झाली आणि बऱ्याच महिन्यांनी बाबूजींची भेट झाली. बाबूजींसोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीपासून त्यांनी त्यांच्या “माझे गुरूदेव” या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, "मला लगेच आणि अंतस्फुर्तीने कळले की मला असा माणूस सापडला आहे केवळ तोच माझा गुरु होऊ शकतो आणि मला माझ्या ध्येयापर्यंत नेऊ शकतो."
आपल्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना, चारीजी त्यांच्या आध्यात्मिक सरावात परिश्रम घेत होते आणि बाबूजींबद्दल असलेली त्यांची भक्ती उत्कट होती. बाबूजींचे मानवतेबद्दल असलेले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले.
बाबूजींच्या संपूर्ण भारतभरातील विस्तृत प्रवासात चारीजी त्यांच्या सोबत असत. बाबूजी आणि त्यांच्या शिकवणींकडे आकर्षित होऊन भारतात आलेल्या युरोपियन लोकांनंतर, 1972 मध्ये चारीजी युरोप आणि अमेरिकेच्या परदेशी प्रवासाच्या मालिकेतील पहिल्या प्रवासात बाबूजींसोबत गेले. ते इच्छुकांना भेटले, ध्यानसत्रे घेतली, भाषणे दिली, प्रश्नांना उत्तरे दिली. त्यां दोघांत परस्परावलंबित्वाचे प्रेमळ नाते निर्माण झाले.
त्यांच्या हयातीत बाबूजींनी चारीजींना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले आणि 1983 मध्ये बाबूजींचे महानिर्वाण झाल्यावर चारीजींनी त्यांचे आध्यात्मिक प्रतिनिधी म्हणून पदभार स्वीकारला. बाबूजींनी चालू केलेले कार्य सुरू ठेवण्यासाठी आणि मानवतेविषयी त्यांचे स्वप्न पुढे नेण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली बाबूजींनी स्थापलेली संस्थेचा भारतात आणि इतर शंभराहून अधिक देशांमध्ये विस्तार झाला. बाबूजींच्या कालखंडातील 5,000 सभासद संख्या चारीजींच्या निर्वाणसमयी 500,000 पर्यंत वाढली होती. स्वयंसेवेवर आधारलेल्या या संस्थेचा निधी हा देणग्यांद्वारे जमा होत असे.
पूर्वेकडील हृदय व पाश्चात्य मन असलेले अशा बाबूजींनी केलेल्या आदर्श मानवाच्या व्याख्येप्रमाणे चारीजींनी स्वतःला सिद्ध केले.
एक उत्तम वक्ता असण्याबरोबरच त्यांची काम करण्याची क्षमता जवळजवळ अलौकिक होती. त्यांना भेटायला आलेल्या लोकांची आणि ज्यांना प्रवासादरम्यान ते भेटले त्यांची संख्या खूप असूनही त्यांच्याकडे मुक्तपणे आलेल्या व्यक्तींशी संवाद साधण्याच्या स्वेच्छेसाठी ते प्रसिद्ध होते. त्याच्यासोबतच्या समोरा-समोर झालेल्या भेटीमुळे जीवन बदललेल्या व्यक्तींच्या कथा हजारोंनी आहेत.
त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली. प्राणप्रिय असलेल्या बाबूजींना आदरांजली वाहणार्‍या माझे गुरूदेव या पुस्तकाचा 20 भाषांमध्ये अनुवादित झाला आहे. इतर पुस्तकांमध्ये, बाबूजींसोबतच्या त्यांच्या परदेशातील प्रवासाच्या नोंदी, आत्मचरित्र, आणि भारत व परदेशात दिलेल्या, गुरुच्या शिकवणी विशद करणार्‍या व प्रतिनिधित्व करणार्‍या असंख्य भाषणांचे खंड समाविष्ट आहेत.
2008 पासून, चारीजींना आजारपणाने ग्रासले होते आणि 2010 मध्ये, चारीजींनी त्यांच्या निधनानंतर कमलेश. डी. पटेल हे त्यांचे उत्तराधिकारी होणार आहेत हे त्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व अभ्यासींना सांगितले. त्यांना सुरुवातीपासूनच पूर्ण पाठिंबा मिळण्याचे जे एक प्रचंड मोठे कार्य होते, त्याची खात्री करण्याचा हा त्यांचा मार्ग होता. त्या दिवसापासून ते त्यांच्या निधनापर्यंत, ते दोघे जवळजवळ नेहमीच एकत्र होते.
20 डिसेंबर 2014 रोजी चारीजींचे निधन झाले, आणि श्री. कमलेश. डी. पटेल, ज्यांना प्रेमाने दाजी म्हणून ओळखले जाते, त्यांच्याकडे जागतिक हार्टफुलनेस मार्गदर्शकाची भूमिका सुपूर्द केली गेली.

मागील
पुढे
HeartfulnessLogo_Wht_Pwd
play.png
app.png

सोशल मीडिया

  • लिंक्डइन लिंक्डइन
  •  फेसबुक फेसबुक
  • ट्विटर ट्विटर
  • इंस्टाग्राम इंस्टाग्राम
  • व्हॉट्सअॅप व्हॉट्सअॅप

उपयुक्त दुवे

  • दाजी
  • कान्हा
  • प्रशिक्षक
  • दैनिक विचार
  • देणगी

अंतर्दृष्टी

  • हार्टफुलनेस रिसर्च
  • हार्टफुलनेस मासिक

© 2025 हार्टफुलनेस - सर्व हक्क राखीव

अटीगोपनीयता